पुणे दिनांक १० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) गणपती बाप्पाचे आगमन हे दिनांक ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरणात झाले आहे.आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साही आणि भक्तीमय वातावरणात गौरीचे आगमन झाले आहे. माता पार्वती म्हणजेच गौरी हिचे देखील गणपती नंतर पाठोपाठ आगमन झाले आहे.दरम्यान आपल्या महाराष्ट्रात गौरी-गणपतीचा सण मोठ्या श्रद्धेने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.दरम्यान गौरीचे विसर्जन साधारण तिसऱ्या दिवशी वाजत गाजत व जयघोषात केले जाते. महाराष्ट्रात गौरी -गणपती सणांचे आगळे वेगळे सांस्कृतिक महत्त्व आहे.