केंद्रीय कृषिमंत्र्यांना महाराष्ट्र लाडका नाही? शेतकऱ्यांना भरपाई नाही पण आमचे कृषीमंत्री सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली बाया नाचवतात.सरकार लाडक्या बहिणीच्या श्रेयवादात अडकले – विजय वडेट्टीवार
पुणे दिनांक १० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ‘ केंद्रीय कृषिमंत्री यांनी आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्याचा तातडीने दौरा करून तात्काळ ३ हजार ४४८ कोटींची मदत देण्याची घोषणा केली आहे. मात्र केंद्रीय कृषिमंत्री हे महाराष्ट्रात अद्याप फिरकलेच नाही.त्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या वतीने याबाबत पाठपुरावा केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे केला नाही.केंदीय कृषीमंत्र्याला महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे अश्रू दिसले नाही का? महाराष्ट्रालाच केंद्रीय कृषिमंत्र्यांची साप्तानिक वागणूक का? केंद्रा साठी महाराष्ट्र हा लाडका नाही का? असा खडा सवाल काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या सरकारला केला आहे.
दरम्यान मराठावाड्यातील अतिवृष्टीबाधित शेतकरी यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी.केंदीय कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्रात यावे.यासाठी महाराष्ट्रातील कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्राकडे आग्रह धरायला पाहिजे होता.पण तसे झाले नाही.याऊलट राज्यात पाऊस कमी झाला व जास्त झाला तरी कृषीमंत्र्यांना शिव्या खाव्या लागतात एवढ्या नर्तिका कशाला नाचवतो अशी टीका विरोधक माझ्यावर करतात.अशी मुक्ताफळे उधळत राज्याच्या कृषीमंत्र्यांनी केली आहे. व आपली जबाबदारी झटकली आहे.अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.केंदीय कृषी मंत्र्याचे पथक हे महाराष्ट्र शेतकरी वर्गाचे झालेले नुकसान पाहण्यासाठी केव्हा येणार ? दरम्यान एक फुल व दोन हाप यांनी तशी केंद्रीय कृषिमंत्र्यांबरोबर चर्चा केली आहे का? हे महायुतीचे सरकार श्रेयवादात अडकले आहे.दरम्यान या सरकार मधील एक जेष्ठ मंत्री स्वतःच्या मुलीला व जावयाला नदीत ढकला असं म्हणत असतील तर या महायुतीच्या सरकार कडून सर्व सामान्य जनतेने काय अपेक्षा ठेवायची ? असा टोला त्यांनी मारला आहे.सरकारच्या फसव्या योजनाला महाराष्ट्रांतील जनता कंटाळली आहे.तसेच केंद्र सरकार आणि गुजरातकडे महायुतीचा स्वाभिमान गहाण ठेवल्याचा टोला देखील महायुती सरकारला विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाविला आहे.