Home Breaking News बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी बिल्डिंग वरुन उडी मारुन केली आत्महत्या

बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी बिल्डिंग वरुन उडी मारुन केली आत्महत्या

79
0

पुणे दिनांक ११ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच बाॅलीवूड विश्वातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून मुंबईतील बाॅलीवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.बांद्रा येथील बिल्डिंग वरून उडी घेत आत्महत्या केली आहे.अद्याप त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान या प्रकरणी बांद्रा पोलिसांना आत्महत्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान मुंबईतील बांद्रा येथील आलमेडा पार्क येथील बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरुन त्यांनी उडी मारुन आपली जीवनयात्रा संपवली आहे.या घटने बाबत पोलिसांनी सांगितले की.आज सकाळी नऊ वाजता मलायका यांचे वडील अनिल अरोरा यांनी बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मलायका हिचा घटस्फोटीत पती अरबाज खान हा त्यांच्या कुटुंबीयांसह मलायकाच्या मुंबईतील बांद्रा येथील निवासस्थानी पोहोचला आहे.दरम्यान आत्महत्या केलेल्या अनिल अरोरा यांचा मृतदेह हा पोस्टमार्टम करीता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Previous articleआज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी
Next articleमुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांच्या आमदाराच्या बाॅडीगार्डची भररस्त्यात कारचालकाला मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here