पुणे दिनांक ११ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू -काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅग्रेस पक्षाच्या वतीने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.दरम्यान काॅग्रेस पक्षाचे सरकार हे जम्मू काश्मीर राज्यात सत्तेवर आले तर प्रत्येक कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये देणार आहे.याशिवाय १ लाख रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.कुंटुबातील प्रत्येक माणसाला ११ किलो तांदूळ.व २५ लाख रुपयांचा वीमा.व बचत गटातील महिलांना ५ लाख रुपये बिन व्याजी कर्ज असे या जाहीर नाम्यात काॅग्रेस पक्षाच्या वतीने आश्वासन देण्यात आले आहे.