पुणे दिनांक ११ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.दरम्यान आजच्या सुनावणीकडे करोडो मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा खुप मोठ्या प्रमाणावर तापला आहे.दरम्यान मराठा समाजाला सन २०१९ मध्ये एससी.व बीसी ही शिक्षण व नोकरी करीता आरक्षण देण्यात आले होते. ते आरक्षण उच्च न्यायालयात वैध देखील ठरविण्यात आले होतं.मात्र सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केले होते.दरम्यान याच निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.मागील एक वर्षात कोणत्याही प्रकारचा निर्णय मराठा समाजाच्या बाजूने लागला नाही.त्यामुळे आजच्या याचिकावरच्या सुनावणीवर करोडो मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.दरम्यान आज दुपारच्या सत्रात ही सुनावणी होणार आहे. आजची सुनावणी ही सकारात्मक होईल असा विश्वास याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे.