Home Breaking News पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची मोठी घटना, भरघाव वेगाने आलेल्या डंपरने...

पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची मोठी घटना, भरघाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला उडवले पती-पत्नी घटनास्थळीच ठार चालक फरार

75
0

पुणे दिनांक १२ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन नंतर पुन्हा एकदा तशीच दुर्घटना कोलड रोडवरील भुकूम तालूका मुळशी येथील गारवा रोडवर घडली आहे.भरघाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकी स्वराला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातामुळे यात पती व पत्नीचा घटनास्थळीच दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.दरम्यान सदरच्या अपघातानंतर डंपरचा चालक हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.

दरम्यान सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात ठार झालेल्या दुचाकी वरील दोघांची नावे १) अनिल काळू सुर्यवंशी व त्यांची पत्नी प्रिया दोघे ( रा.लवळेफाटा ) अशी आहेत. सदर चार डंपर चालकाने नियमांचे उल्लंघन करून भरघाव वेगाने डंपर चालवून समोरुन येणा-या दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघां पती व पत्नीचा मृत्यू झाला आहे.सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी डंपर चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.असून पोलिस डंपर चालक याचा शोध घेत आहेत.

Previous articleसीपीएम नेते सीताराम येचुरी यांचे ७२ व्या वर्षी निधन
Next articleविदर्भात महायुतीला ६२ जागांपैकी फक्त २५ जागा मिळण्याची शक्यता सर्वेतून धक्कादायक माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here