Home Breaking News सात वर्षांपूर्वीचा लोढांचा निर्णय अजित पवारांकडून रद्द

सात वर्षांपूर्वीचा लोढांचा निर्णय अजित पवारांकडून रद्द

67
0

पुणे दिनांक १२ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महायुतीच्या मंत्री मंडळातील मंत्री मंगल प्रभात लोढांचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रद्द केला आहे.यात चाणक्य सेंटर ची निविदा रद्द करण्यात आली आहे.तसेच मागील सात वर्षांच्या पूर्वी पर्यटन मंत्री असताना मंगलप्रभात लोढां यांनी हा निर्णय घेतला होता.दरम्यान या बैठकी साठी अजित पवार यांच्यासह पर्यटन खात्याचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान ८५ कोटी रुपयांच्या या निविदेतून पुण्यातील कार्ला येथे चाणक्य एक्सलन्स सेंटर उभारले जाणार होते.दरम्यान आधीच महायुती मध्ये मोठ्या प्रमाणावर श्रेयवाद लाडकी बहीण योजना चा उफाळून आला आहे.त्यात आता मागील सात वर्षांपूर्वीच्या मंगलप्रभात लोढां यांच्या पुण्यातील कार्ला येथील चाणक्य सेंटरची निविदा रद्द केल्याने पुन्हा महायुती मध्ये सर्व काही आलबेल आहे.असं नाही हे या वरुन सिध्द होत आहे.

Previous articleमंत्री धर्मराव आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम आज शरद पवार गटात प्रवेश करणार
Next articleपुणे रेल्वे जंक्शनवर IB ची करडी नजर, मोठ्या घातपाताचा संशय? गुप्तचर विभागाला २० ठिकाणं संशयित आढळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here