Home Breaking News सीपीएम नेते सीताराम येचुरी यांचे ७२ व्या वर्षी निधन

सीपीएम नेते सीताराम येचुरी यांचे ७२ व्या वर्षी निधन

104
0

पुणे दिनांक १२ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सीपीएम नेते सीताराम येचुरी यांचे आज निधन झाले आहे.दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सीपीएमच्या दिग्गज नेत्यांपैकी महत्वाचे नेते असलेले येचुरी मागील एक महिन्यांपासून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते.

दरम्यान सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी तामिळनाडू येथे एका तेलुगू कुंटुंबात झाला होता.त्यांचे वडिल इंजिनियर होते.दरम्यान केरळ व बंगाल बाहेरील सीताराम SFI चे पहिले अध्यक्ष होते.त्यांनी १९६९ मध्ये तेलंगणा आंदोलनात भाग घेतला होता.नंतर दिल्लीतील JNU मध्ये शिक्षण घेतले व येथील विद्यार्थी संघटनेचे तीन वेळा अध्यक्ष बनले.

Previous articleपुणे रेल्वे जंक्शनवर IB ची करडी नजर, मोठ्या घातपाताचा संशय? गुप्तचर विभागाला २० ठिकाणं संशयित आढळली
Next articleपुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची मोठी घटना, भरघाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला उडवले पती-पत्नी घटनास्थळीच ठार चालक फरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here