पुणे दिनांक १२ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील महत्त्वाच्या व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असलेल्या ठिकाणी आता होणा-या घडामोडीवर गुप्ताचार यंत्रणेची बारीक व करडी नजर असते.दरम्यान रेल्वे ट्रॅकवर मागील काही दिवसांपासून मोठ्या वस्तू ठेवण्याच्या घटना ह्या सातत्याने घडत आहेत.याच पार्श्वभूमीवर आता गुप्तचर यंत्रणांकडून रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने काही ठोस उपाययोजना करण्या घ्या सुचना देण्यात आले आहेत.रेल्वे सुरक्षा बलाची काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आय बी ( IB) बरोबर बैठक झाली आहे.सदरच्या बैठकीत गुप्तचर विभागाच्या वतीने रेल्वेच्या सुरक्षा प्रशासनला काही संशयास्पद व संवेदनशील ठिकाणं सांगितले आहे.व या संशयास्पद ठिकाणी घातपाताची घटना घडू शकते अशा सुचना देण्यात आल्या आहेत.यात काही संवेदनशील भागातून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकची देखील माहिती गुप्तचर यंत्रणेला दिली आहे.
दरम्यान यात गुप्तचर विभागाला पुणे परिसरातील एकूण जवळपास २० ठिकाणी आढळली आहेत. या २० ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याच्या सुचना रेल्वे प्रशासनला दिल्या आहेत.दरम्यान या २० ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या वतीने तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर घातपाताच्या कृतींना आळा घातला येइल.तसेच या २० संशयास्पद ठिकाणी रेल्वेचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी हे गस्त घालणार आहेत.अशी उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी सोलापूर रेल्वे लोहमार्गवर कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन जवळ काही अज्ञात व्यक्तीने रेल्वे ट्रॅकवर २३० k g चे ‘ स्लिपर’ ठेवल्याचे आढळून आले होते.हा प्रकार रेल्वे गॅगमॅनच्या निदर्शनास आला व तातडीने ते स्लिपर रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला घेतल्याने मोठी रेल्वेची दुर्घटना टळली आहे.दरम्यान अशाच प्रकारच्या घटना पुणे विभागात देखील होण्याची शक्यता आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर ‘ आयबी ‘ च्या वतीने रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा विभागाला देण्यात आल्या आहेत.