पुणे दिनांक १२ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या आज जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.दरम्यान या करीता गडचिरोली मध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.दरम्यान या सोहळ्यानंतर मंत्री धर्मराव आत्राम व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसणार आहे.धर्मराव आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम ही तिच्या वडिलांच्या विरोधात शरद पवार यांच्या गटामधून विधानसभा निवडणुक तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता आहे.दरम्यान त्यांच्या पक्षप्रवेशा पूर्वी काही दिवस आधी मंत्री धर्मराव आत्राम हे संतप्त होत मुलगी व जावायला नदीत टाकण्याची अशोभनीय भाषा वापरली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी गडचिरोली येथे जाहीर सभा मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली चूक मान्य करत घरामध्ये फुट पाडू देऊ नका.असे आवाहन धर्मराव आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना केले होते.