Home Breaking News गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत लोकलसेवा रात्रभर राहणार सुरू

गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईत लोकलसेवा रात्रभर राहणार सुरू

88
0

पुणे दिनांक १३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) गणपती बाप्पाचे विसर्जन दिवशी दिनांक १७ सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशीला रात्रभर मुंबईत लोकल सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.दरम्यान गणेश विसर्जनाच्या नंतर गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान या दिवशी सीएस‌एमटी ते ठाणे तसेच कल्याण या रेल्वे मार्गावर रात्रीच्या सुमारास दिनांक १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत एकूण २२ विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहे.दरम्यान या कालावधीत सीएस‌एमटीहून विशेष एक लोकल कल्याण करीता १ .४० वाजता सुटेल व तर ती कल्याणला ३.१० वाजता पोहोचेल असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय, कांद्यावरील निर्यात शुल्क मागे लोकसभेला शेतकऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या डोळ्यात आणलं होतं पाणी
Next articleभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here