पुणे दिनांक १३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दिलासा मिळाला आहे.कथीत दारु घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.दरम्यान १० लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.दरम्यान १७७ दिवस ते तिहार जेल मध्ये होते.आता त्यांची सुटका होणार आहे.दरम्यान त्यांना दारु घोटाळा प्रकरणी ईडीच्या वतीने अटक करण्यात आली होती.त्यानंतर त्यांना सीबीआयने अटक केली होती.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या करीता आजचा दिवस महत्वाचा आहे .दरम्यान कथीत दारु घोटाळा प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती.ईडीशी संबंधित मनी लाॅंड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना यापूर्वीच न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.सीबीआयशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मागच्या महिन्यात जामीन मंजूर करण्यात आला होता.दरम्यान केजरीवाल यांनी सीबीआयने नोंदवलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात अटक आणि जामीन नाकारण्याला आव्हान देणा-या दोन याचिका स्वतंत्र पणे दाखल केल्या होत्या. दरम्यान खंडपीठाच्या वतीने या याचिकावरील निर्णय ५ सप्टेंबर रोजी राखून ठेवला होता.त्याच्यावर आज निर्णय देण्यात आला आहे.सीबीआयने २६ जून रोजी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून ते तुरुंगात होते.तब्बल १७७ दिवसांनी ते आज तुरुंगाबाहेर येणार आहे.त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आम आदमी पक्षाला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.