Home Breaking News विदर्भात महायुतीला ६२ जागांपैकी फक्त २५ जागा मिळण्याची शक्यता सर्वेतून धक्कादायक माहिती

विदर्भात महायुतीला ६२ जागांपैकी फक्त २५ जागा मिळण्याची शक्यता सर्वेतून धक्कादायक माहिती

101
0

पुणे दिनांक १३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विदर्भात सर्वे करण्यात आला आहे.यात महायुतीला मोठ्या प्रमाणावर नुकसान होतांना या सर्वेत दिसत आहे.तसेच संघाचा गड असणाऱ्या नागपूरात देखील भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर दणका बसत आहे.विदर्भात एकूण ६२ जागा आहेत.त्यापैकी भाजपला १८ जागा तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ५ तर अजित पवार यांच्या गटाला फक्त २ जागा मिळताना दिसत आहेत. सद्यस्थितीत येथे महायुतीच्या एकूण ३९ जागा आहेत. एकूण १४ जागांवर महायुतीला तगडा फटका बसत असून या १४ जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात जात आहेत . त्यामुळे आता महायुतीच्या गटात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान विधानसभेत महायुतीला सर्वात मोठा फटाका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाविकास आघाडीचे सरकार पाडून फोडाफोडी करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करणे तसेच  अजित पवार यांनी देखील शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली व काही आमदार सह महायुती सरकार मध्ये सहभागी झाले.राज्यात अनेकांना सीबीआय व ईडी तसेच इन्कमटॅक्स यांच्या धमक्या देऊन त्यांना आपल्याकडे वळवून घेणे.हे महाराष्ट्रातील अनेक मतदारांना रुचलेले नाही.त्यामुळे हे धक्कादायक सर्वे बाहेर आले आहेत.तसेच नागपूर हा भारतीय जनता पक्षाचा व संघाचा गड समजला जातो.तिथे एकूण १२ जागा आहेत.सर्वे नुसार तिथे भारतीय जनता पक्षाला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागेल असं सर्वेत दिसत आहे.दरम्यान लाडकी बहीण योजनाचा देखील महायुतीला फायदा होताना दिसत नाही.दरम्यान एकूण २८८ जागांपैकी विधानसभेत महाविकास आघाडीला १८० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात असा दावा काॅग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.तर हा सर्वे स्वतः भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.सर्वेत आलेल्या आकडेवारी नंतर महायुतीच्या गटात प्रचंड प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Previous articleपुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची मोठी घटना, भरघाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला उडवले पती-पत्नी घटनास्थळीच ठार चालक फरार
Next articleदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, १७७ दिवसांनंतर केजरीवाल जेलच्या बाहेर येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here