पुणे दिनांक १३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान कांदा व बासमती तांदूळा वरील निर्यात शुल्क हाटविण्यात आले आहे.दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केंद्र सरकारच्या वतीने कांद्यावरील निर्यात शुल्क हाटविण्याची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी धुडकावून लावली होती.त्याचा फटका म्हणून शेतकरी वर्गाने महाराष्ट्रातील महायुती घ्या उमेदवारांच्या डोळ्यात पाणी याच कांद्याने आणलं होतं.म्हणून त्यांची पुनरावृत्ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नको म्हणून केंद्र सरकारच्या वतीने आता कांदा व बासमती तांदळावरील निर्यात शुल्क मागे घेतले आहे.त्यामुळे आता शेतकरीवर्गाला निर्यात मार्ग मोकळा झाला आहे.आता सरकारने किमान निर्यात मूल्याचा निर्णय मागे घेतला आहे.दरम्यान यापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने कांदा निर्यात मर्यादित केली होती. दरम्यान आताच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार मोठा लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.