पुणे दिनांक १३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहे.त्यामुळे मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवार आता आपल्या परीने प्रयत्न करत आहे.याच दरम्यान मुंबईतील भायखळा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेच्या महिला आमदार यामिनी जाधव या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात भायखळा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज आहे.व हाच धागा पकडून आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम समाजाच्या महिला यांना नुकतेच बुरखा वाटपाचा कार्यक्रम करून आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या ह्या कृतीवर आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे.तुष्टीकरणाचे राजकारण आम्हाला स्वीकार करण्यासारखे नाही.असे आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान या वर उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील यामिनी जाधव यांच्यावर टीका केली आहे.आता बुरखा वाटपावरून भारतीय जनता पक्षाचे नेते व शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यात वाद होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.