पुणे दिनांक १४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे ते सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील इनामदार वस्तीत एका उद्योजकाच्या घरी भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. सदर चा गोळीबार हा जमिनीच्या व्यवहारातून झाला आहे. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.यात तीन राऊंड फायर करण्यात आले आहे.यात एकजण गोळीबारात गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दशरथ शितोळे हे उरुळी कांचन येथील इनामदार वस्तीत राहतात.त्यांचेकडे काळूराम गोते हे गेले होते.या दोघांमध्ये रिंग रोड जमीन व्यवहारावरून यावेळी वाद झाल्यानंतर संतापलेल्या दशरथ शितोळे यांनी काळूराम यांच्यावर तीन राऊंड फायर केले यात काळूराम हा गंभीर रित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या गोळीबारानंतर लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.व त्यांनी या गोळीबार प्रकरणी दशरथ शितोळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.व पुढील तपास करीत आहेत.