Home Breaking News गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सोशल मीडिया अकाऊंटची चार तास चौकशी गजानन मारणेला रिल्स...

गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सोशल मीडिया अकाऊंटची चार तास चौकशी गजानन मारणेला रिल्स बनवणं पडलं महागात

118
0

पुणे दिनांक १४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा एकदा चांगलाच अडचणीत सापडला आहे.आज पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजा मारणे व आणखी एक साथीदाराची आज चार चौकशी केली आहे.त्यानंतर त्या दोघांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. आता कोणत्याही गुन्ह्यात नव्हे तर रिल्स मुळे गजा मारणेला पोलिस स्टेशन मध्ये जावं लागलं आहे.गजा मारणे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पुन्हा चांगलाच गोत्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचे सोशल मीडिया वर अकाउंट आहे.दरम्यान या अकाउंट वर तो रिल्स बनवून अपलोड करतो.मात्र हे रिल्स करमणुकीसाठी नसून दहशत पसरविण्याचे काम करतात.तसेच या रिल्स व व्हिडिओ मुळे तरुण पिढीवर परीणाम होत असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान GM boys या नावाने हे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे.दरम्यान या अकाऊंटवरुन गजानन मारणे यांचे साथीदार गजानन मारणेचा उल्लेख डाॅन .भाई असा करतात.तसेच दहशत निर्माण करणारे रिल्स टाकतात.दरम्यान असाच एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 👮 त्याला बोलावून घेत आज तब्बल चार तास चौकशी केली आहे.गजानन मारणे व टीपू पठाण नावाच्या साथीदारामार्फत इन्स्टाग्रामवर रिल्स बनवतो.तसेच शेअर करतो.त्यामुळे त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.तसेच सोशल मीडिया अकाऊंटचा तपास केला.तसेच या नंतर असे व्हिडीओ न बनवण्याची समज त्यांना पोलिसांनी 👮 दिली आहे.तसेच आता या दोघांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे.

Previous articleउरुळी कांचन येथील इनामदार वस्तीत भरदिवसा ३ राऊंड फायर एकजण गंभीर रित्या जखमी
Next articleलालबाग राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या महिलेला आली फिट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here