पुणे दिनांक १४ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून.दरम्यान विधानसभांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते भाजपच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या पदाधिकारी यांची बैठक घेणार आहेत.दरम्यान मागील आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत आले होते.त्यावेळी त्यांनी देखील भाजपच्या तयारीचा आढावा घेतला होता.व तिन्ही पक्षाच्या वतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे. योग्य पध्दतीने जागा वाटपचा तिढा सोडविण्यासाठी त्यांनी बैठक घेतली होती.त्या नंतर आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.ते देखील विधानसभा निवडणुकी बाबतच्या तयारी संदर्भात आढावा घेणार आहेत.दरम्यान महायुतीत जागेचा तिढा कायम आहे.दरम्यान पितृपक्षाच्या आठवड्या नंतरच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील विधान सभा उमेदवारांची पहिली यादी घोषित होण्याची शक्यता आहे.असे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.