Home Breaking News पंढरपुरात उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली

पंढरपुरात उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली

170
0
  1. पुणे दिनांक १५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंढरपुरात धनगर समाजाच्या वतीने राज्य व्यापी बेमुदत उपोषण सुरु आहे.दरम्यान आज उपोषण करणा-या पाच जणांची तब्येत अचानकपणे बिघडली यात उपोषणकर्ते योगेश धरम हे चक्कर येऊन कोसळले.त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पण अन्य चार जण उपोषणकर्ते यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिला आहे.दरम्यान धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पंढरपूरात मागील सात दिवसांपासून उपोषण सुरु आहे.दरम्यान काल उपोषणस्थळी चंद्रकांत पाटील व शंभुराज देसाई यांनी उपोषण कर्ते यांची भेट घेतली होती.व समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता.काल त्यांच्या सोबतची बैठक ही निष्फळ ठरली व उपोषणकर्ते हे उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.दरम्याण महायुतीच्य सरकार सोबतच्या बैठकीवर उपोषणकर्ते यांनी बहिष्कार घातला.

Previous articleपुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात हाणामारी गोळीबारात एकाचा मृत्यू तर गंभीर रित्या जखमी
Next articleरायगड जिल्ह्यातील कोंझर घाटात ५० फुट दरीत बस कोसळली सुदैवाने जीवितहानी टळली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here