पुणे दिनांक १५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार रायगड जिल्ह्यातील कोंझर घाटात ५० फुट दरीत बस कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.सुदैवाने या बस मधून ४० पेक्षा जास्त प्रवासी हे प्रवास करत होते.मात्र सुदैवाने एवढी मोठी दुर्घटना होऊन देखील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत.ही बस रायगड जिल्ह्यातून कोंझर घाटातून मुंबईकडे जात असताना या बसला अपघात झाला आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळाले ल्या माहिती नुसार ही बस रायगड जिल्ह्यातील कोंझर घाटातून मुंबईकडे जात असताना.रस्ताच्या बाजूला चिखलात घसरल्याने ५० फुट दरीत कोसळली आहे. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले.व अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूपणे बाहेर काढले आहे.यात १० महिला व १० लहान मुलांचा समावेश आहे.दरम्यान यातील सर्व प्रवाशांना आता बाहेर काढले आहे.अपघात झाल्या नंतर बसमधील सर्व प्रवासी हे प्रचंड प्रमाणावर घाबरून गेले होते.पण स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना या वेळी धीर दिला आहे