Home Breaking News पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात हाणामारी गोळीबारात एकाचा मृत्यू तर गंभीर रित्या...

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात हाणामारी गोळीबारात एकाचा मृत्यू तर गंभीर रित्या जखमी

91
0

पुणे दिनांक १५ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून पुणे जिल्ह्यातील खडकवासला जवळील खानापूर गावामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे.दरम्यान ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्या बाबत माहिती मिळत आहे.शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात दोन गटात गोळीबाराची घटना घडली असून यात एक जण ठार झाला आहे तर दुसरा गंभीर रित्या जखमी झाला आहे.सदरच्या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान या घटने नंतर आता गावात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील पानशेत येथील खानापूर गावातील सांबरेवाडी रस्त्यावर ही घटना घडली आहे.दरम्यान गावातीलच दोन गट आहेत.पूर्व वैमनस्यातून एका गटाकडून पहिल्यांदा गोळीबार करण्यात आला होता.दरम्यान त्या गटाला प्रत्यूत्तर म्हणून दुसऱ्या गटाने देखील गोळीबार केला.दरम्यान गोळीबारानंतर दोन्ही गटातील व्यक्ती आता फरार झाले आहेत.दरम्यान सदरच्या गोळीबारानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी 👮 मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Previous articleलालबाग राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या महिलेला आली फिट
Next articleपंढरपुरात उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here