Home Breaking News पंढरपुरात उपोषणस्थळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न एकच खळबळ

पंढरपुरात उपोषणस्थळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न एकच खळबळ

84
0

पुणे दिनांक १६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पंढरपुरातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.मागील आठवड्यापासून पंढरपुरात धनगर समाजाच्या वतीने उपोषण सुरू आहे.धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याची मागणी त्यांनी या उपोषणस्थळी लावून धरली आहे.व या संदर्भात काल मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व समाजाच्या काही नेत्यांबरोबर एक बैठक देखील झाली आहे.पण उपोषणकर्ते हे उपोषणावर ठाम आहेत.दरम्यान आज सायंकाळी पंढरपूरात उपोषणस्थळी आंदोलक संजय चौगुले यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.दरम्यान चौगुले यांना तातडीने उपचारा करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संजय चौगुले यांनी विष प्यायल्यानंतर उपोषणस्थळी एकच खळबळ उडाली.दरम्यान यापूर्वी देखील एका आंदोलनकर्त्यांने विष पिऊन आत्महत्येच प्रयत्न केला होता.आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन धनगर समाजाचे आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Previous articleशिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Next articleगणेश विसर्जनाच्या वेळी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करणार -पोलिस आयुक्त अमितेश कुमार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here