पुणे दिनांक १६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून रेल्वे ट्रॅकवर मोठे दगड ठेवून रेल्वेचा घातपाताचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांच्या दौंड लोहमार्ग पोलिसांनी तब्बल २७ वर्षांनी मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावे.१) सुभाष पवार २) पिंट्या काळे असं संशयित आरोपींची नावे आहेत.या दोघांनी दिनांक २ मे १९९७ रोजी पुणे – दौंड – सोलापूर लोहमार्गावर उरुळी कांचन ते यवत रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे ट्रॅकवर मोठे दगड ठेवून चेन्नई एक्सप्रेस रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला होता.व रेल्वेतील प्रवासी यांना लुटण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला होता.दरम्यान आता अशा घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.पुणे ते सोलापूर दरम्यान कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनच्य दरम्यान देखील मागील काही दिवसांपूर्वीच रेल्वे ट्रॅकवर मोठे दगड ठेवून घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता.आता याच दुष्टीने रेल्वे लोहमार्ग पोलीस व आरपीएफच्या सुरक्षा रक्षक हे रेल्वे ट्रॅकवर रात्रंदिवस गस्त घालत आहेत.तसेच काही संशयास्पद ठिकाणी रेल्वेच्या वतीने सीसीटीव्ही बसवण्यांचे काम रेल्वे सुरक्षा विभागाच्या वतीने घेण्यात आले आहे.