पुणे दिनांक १६ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राहुल गांधी यांची जीभ छाटण्यासाठी ११ लाख रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर केले होते.यावर काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार गायकवाड यांच्यावर बोलताना म्हणाले की ते क्षमतेपेक्षा जास्त बोलत आहेत.आणि वागत आहेत.त्यांना आलेला सत्तेचा माज आणि मस्ती आगामी विधानसभा निवडणुकीत जनताच उतरवेल असं म्हणाले आहेत.दरम्यान आज बुलढाणा पोलिस स्टेशन समोर काॅग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.व गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर आमदार संजय गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी बोलताना काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे म्हणाले की.राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती विदारक असून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम महायुतीच्या सरकारने केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.दरम्यान ‘ राजकीय सलोखा आणि संसदीय प्रथा.परंपरा.सन्मान धुळीला मिळवण्याचे काम सरकार सातत्याने करत आहे.अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा ‘ अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त केला जात असून त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.