Home Breaking News उच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला पुण्यात रात्री अपघात एकजण ताब्यात

उच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला पुण्यात रात्री अपघात एकजण ताब्यात

90
0

पुणे दिनांक १७ सप्टेंबर (पोलखोलननामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला सोमवारी रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने दारुच्या नशेत धडक दिली आहे.दरम्यान सदर च्या अपघातात चंद्रकांत पाटील हे थोडक्यात बचावले आहे.त्यांना या अपघातात कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री सोमवारी उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील मानाच्या गणपतीच्या दर्शनाला गेले होते.त्यावेळी मद्यधुंद वाहन चालकांने त्यांच्या गाडील जोरदार धडक दिली आहे.या अपघातात मंत्री चंद्रकांत पाटील हे थोडक्यात बचावले आहेत.परंतू त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.पोलिसांनी दारुच्या नशेत धुंद असलेल्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Previous articleमध्यरात्रीपासून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहाव्यांदा उपोषण सुरु, उपोषणाचं हत्यार उपसल्याने महायुती सरकारची होणार कोंडी
Next articleपुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत रथाला फटाक्यांमुळे 🔥 आग, कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here