पुणे दिनांक १७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई येथील गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेजण तसेच राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे पोहोचले आहेत दरम्यान मुंबई महापालिकेच्या वतीने त्यांना निमंत्रण देण्यात आले होते.तसेच या ठिकाणी हे मान्यवर हजर राहून चौपटीवर गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुक सहभागी होऊन गणपती बाप्पावर फुलांची पुष्पवृष्टी करत आहेत.दरम्यान गिरगाव चौपाटीवर विसर्जन साठी होणा-या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. तसेच परिस्थितीचा आढावा देखील घेत आहेत. तसेच गिरगाव चौपाटीवर गणपती बाप्पाला निरोप देण्या साठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. तसेच रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर मुंबईच्या राजाचे आगमन होत असतं पण या वर्षी मुंबईचा राजा आता गिरगाव चौपाटीवर मार्गस्थ झालेला आहे.