पुणे दिनांक १७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पिंपरी चिंचवडमध्ये मुंबई ते बंगळुरू महामार्गावर वाकडच्या हद्दीत असलेल्या फिनिक्स माॅलच्या गेट क्रमांक आठ जवळ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने हवेत गोळीबार केला आहे.दरम्यान गोळीबार नंतर या भागात एकच खळबळ उडाली होती.हवेत गोळीबार केल्यानंतर आरोपींने पलायन केले आहे.आज अनंत चतुर्दशी निमित्ताने सर्व राज्यात गणेश विसर्जन हे शांततेत होत असताना पूर्वसंध्येला या गोळीबाराच्या घटनेने पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या गोळीबार कोणीही जखमी झाले नसून अज्ञात व्यक्तीने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केला असावा असा प्रथमदर्शनी निश्कर्ष काढण्यात आला आहे.दरम्यान वाकड पोलिस हे आरोपीचा शोध घेत आहेत.