पुणे दिनांक १७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार शेगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे.गणेश विसर्जन मिरवणुकीत अज्ञात व्यक्तीने मिरवणुकीवर दगडफेक केल्याने तब्बल दोन तास विसर्जन मिरवणुकी एकाच जागी खोळंबली होती.यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने दगडफेक करणा-या व्यक्तीला तातडीने अटक करा अन्यथा गणेश विसर्जन होणार नाही अशी भूमिका गणेश मंडाळांच्या कार्यकर्त्यांनी घेतली त्या मुळे तब्बल दोन तासांपेक्षा एकाच ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुक थांबवण्यात आल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यावर पोलिसांनी 👮 हस्तक्षेप करून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सदरची गणेश विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत.आता तणावाचे वातावरण निवाळले आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश विसर्जनाच्या वेळी किरकोळ वादातून गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली.यावेळी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होत एकाच जागी मुख्य चौकात गणेश विसर्जन मिरवणुक थांबवली व दगडफेक करणा-यांना तातडीने अटक करावी त्याशिवाय गणेश विसर्जन करण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे तब्बल तीन तास मिरवणूक एकाच जागी खोळंबली.दरम्यान यावेळी पोलिसांनी 👮 तातडीने मार्ग काढण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर व तणाव वाढू न देता शेवटी तीन तासांनंतर गणेश विसर्जन मिरवणुक आता मार्गी लावली आहे.आता तणावाचे वातावरण निवाळले आहे.दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता मिरवणुकीत तैनात करण्यात आला आहे.