Home Breaking News मध्यरात्रीपासून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहाव्यांदा उपोषण सुरु, उपोषणाचं हत्यार उपसल्याने...

मध्यरात्रीपासून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहाव्यांदा उपोषण सुरु, उपोषणाचं हत्यार उपसल्याने महायुती सरकारची होणार कोंडी

102
0

पुणे दिनांक १७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्रीपासून सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे.रात्री १२ वाजल्यापासून अंतरवली सराटीत ते उपोषणाला बसले आहेत.मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे.अशी मागणी त्यांनी केली आहे.विधान सभेच्या निवडणूकीच्या दरम्यान त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्याने महायुती सरकारची मोठ्या प्रमाणा वर कोंडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान उपोषणला बसण्यापूर्वीच त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे की.त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांच्यावर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान महाराष्ट्रात दगंली झाल्यास दोन्ही सत्ताधारी नेते जबाबदार असतील.तसेच महायुती सरकारला कुठल्याही प्रकारचा अल्टीमेटम देणार नाही.त्यांनी स्वतः आरक्षणचा निर्णय घ्यायचा आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे.असंही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.हे महायुतीचे सरकार मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण देईल का? आता हे पहाणे महत्वाचे असणार आहे.तसेच मराठा समाजाच्या युवकांनी आपले कामधंदा सोडून अंतरवली सराटीत दाखल होऊ नये.असे देखील त्यांनी म्हटले आहे.महायुतीच्या सरकारने हैदराबाद गॅझेटसह सातारा व बाॅम्बे गॅझेट तातडीने लागू करावे व मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे.आरक्षण नाही दिले तर तुम्हाला सर्वकाही भोगावं लागेल.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काही पाडा पाडी झाली तर मला कुठल्याही प्रकारचा दोष द्यायचा नाही.मी हे सर्व दिसावे म्हणून उपोषण करत नाही.असं देखील जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Previous articleगणेश विसर्जनाच्या वेळी ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करणार -पोलिस आयुक्त अमितेश कुमार
Next articleउच्च तंत्रज्ञान शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला पुण्यात रात्री अपघात एकजण ताब्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here