Home Breaking News हातभट्टी दारु व्यावसायिकाचा पोलिस पाटीलवर 🗡️ चाकू हल्ला संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीला...

हातभट्टी दारु व्यावसायिकाचा पोलिस पाटीलवर 🗡️ चाकू हल्ला संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घालून सोडली हवा

102
0

पुणे दिनांक १७ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार एक खळबळजनक घटना गणेशोत्सवा दरम्यान घडली असून सदरची घटना ही चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंपरी तालुक्यातील सकमूर गावात घडली आहे.आज गणेश विसर्जन होत असताना व चंद्रपूरात दारु बंदी असताना दोन हातभट्टी व्यावसायिकांनी सरपंच यांच्या वर चाकूच्या सहाय्याने हल्ला केला आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घालून आरोपींना आमच्या ताब्यात द्या.अशी मागणी करत गाडीची हवा सोडून देण्यात आली.यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांची समजूत घालताना पोलिसांच्या नाकी नऊ आले.तसेच घटनास्थळावरून आरोपींना घेऊन जाताना पोलिसांना अवघड झाले आहे.

दरम्यान सदर घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी आहे.या ठिकाणी पोलिसांच्या छुप्या मार्गाच्या पाठिंब्या मुळे गोंडपिंपरी तालुक्यातील सकमूर गावात हातभट्टी चार व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.आरोपी इरफान शेख गावात अवैध दारू विक्री करतो‌.त्यांने अनेकदा गावातील नागरिकांना धमकवले आहे.त्यांने आज गावातील पोलिस पाटील यांच्यावर चाकूच्या सहाय्याने हल्ला केला.त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक असा पवित्रा घेतला आहे.पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस गाडीतून घेऊन जात असताना ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांच्या गाडीला घेराव घातला व आरोपींना आमच्या ताब्यात द्या अशी मागणी या वेळी केली.तसेच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी गाडीची हवा सोडून दिली आहे.यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या नाकीनऊ आणल्या यावेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. व पोलिसांसमोर आता अडचणी वाढल्या आहेत.

Previous articleपुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला हवेत गोळीबार आरोपी फरार
Next articleभिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक काही काळ परिसरात तणावाचे वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here