Home Breaking News पुण्यात विसर्जन मिरवणूक २४ तास होऊन देखील सुरू, साउंड सिस्टीम वरुन कार्यकर्ते...

पुण्यात विसर्जन मिरवणूक २४ तास होऊन देखील सुरू, साउंड सिस्टीम वरुन कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पोलिसांकडून बळाचा वापर

72
0

पुणे दिनांक १८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला आज तब्बल २४ तास झाले आहे.तरी विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू आहे.यात टिळक रोड.कुमठेकर रोड. लक्ष्मी रोड.व केळकर रोड वरुन मिरवणूका सुरू आहेत.दरम्यान आज सकाळी अलका टॉकीज चौकात गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते व पोलिस यांच्यात बाचाबाची झाली आहे.त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला आहे.दरम्यान चौकात एक सार्वजनिक मंडळ रोडवर एका जागी थांबून साउंड सिस्टीम लावत असल्याने पाठीमागून येणाऱ्या मंडळाची मोठी कोंडी झाली होती.यावेळी पोलिसांनी सांगून देखील संबंधित मंडळ पुढे जात नसल्याने या वेळी पोलिसांनी यावेळी बळाचा वापर केल्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन वाद मिटवला त्यानंतर वाद थांबला व गणेश विसर्जन मिरवणूक पुढे सरकतण्यात आली आहे.

अलका टॉकीज चौकातील वादानंतर टिळक रोडवर  देखील साउंड सिस्टीम वरुन वाद झाला.दरम्यान रात्री १२ नंतर सकाळी ६ वाजेपर्यंत साउंड सिस्टीम बंद ठेवली होती.त्यानंतर सकाळी सहा वाजता पोलिसांनी 👮 साउंड सिस्टीम मंडळांना सुरू करु दिली नाही त्या वरुन पोलिस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला इतर मार्गाने जाणा-या गणेश मंडळांना साउंड सिस्टीम लावण्यास परवानगी दिली होती. आम्हाला सिस्टीम लावण्यास विरोध का केला जात आहे.त्यामुळे गणेश मंडळांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते.यावेळी कार्यकर्ते यांनी पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या समोरच ठिय्या आंदोलन केले.अखेर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तसेच साउंड सिस्टीमवर गणपतीची आरती लावून त्यानंतर पुन्हा गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे.आता दोन्ही ठिकाणीचा तणावाचे वातावरण निवाळले असून गणेश विसर्जन मिरवणूक आता सुरू आहे.

Previous article२५ तासांच्या विसर्जन मिरवणूक नंतर लालबागच्या राजाला अखेरचा निरोप
Next articleसिल्लोडचा उल्लेख वारंवार पाकिस्तान केल्याच्या निषेधार्थ आज सिल्लोड बंदची हाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here