Home Breaking News भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक काही काळ परिसरात तणावाचे वातावरण

भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक काही काळ परिसरात तणावाचे वातावरण

92
0

पुणे दिनांक १८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार भिवंडी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीवर वंजारटट्टी नाका येथे रात्री एक वाजण्याच्या सुमारास हनुमान मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली असून सदर घटनेनंतर या संपूर्ण भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी गणेश मंडळांचे कार्यकर्ते व गणेश भक्तांनी रोडवरुन बसून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी काही जणांना जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

यामुळे या भागात तणावाचे वातावरण वाढल्याने येथील जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.यात काही नागरिक हे जखमी झाले आहेत. दरम्यान यावेळी जमावाकडून झालेल्या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी देखील जखमी झाला आहे.या घटनेनंतर भिवंडीत पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.तर या घटनेनंतर काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तसेच त्यांच्यावर आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.अशी माहिती सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी माध्यामांशी बोलताना दिली आहे.

Previous articleहातभट्टी दारु व्यावसायिकाचा पोलिस पाटीलवर 🗡️ चाकू हल्ला संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घालून सोडली हवा
Next articleआज सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आज फैसला की पुन्हा तारीख पे तारीख?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here