पुणे दिनांक १८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईतील मानाचा गणपती व नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची तब्बल २५ तास विसर्जन मिरवणूक नंतर मुंबईतील चौपाटीवर अखेर चा निरोप देण्यात आला आहे.दरम्यान चौपाटीवर असलेल्या समुद्रात विशेष बोटी द्वारे लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले आहे.दरम्यान यावेळी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.तसेच यावेळी उपस्थित असलेल्या भक्तांनी गणपती बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला.तसेच गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.अशी घोषणाबाजी या वेळी केली आहे.दरम्यान मुंबईत अजून गणेश विसर्जन मंडाळाच्या मिरवणूक सुरू आहे.