Home Breaking News आज सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आज...

आज सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आज फैसला की पुन्हा तारीख पे तारीख?

49
0

पुणे दिनांक १८ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या दोन पक्षातील आमदार अपात्रता प्रकरणांवर आज बुधवारी दिनांक १८ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्व पूर्ण सुनावणी होणार आहे.दरम्यान विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.त्यामुळे या सुनावणीकडे देशातील सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे.दरम्यान विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना अपात्र केले नव्हतं म्हणून शरद पवार व उध्दव ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पक्ष आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीकडे दोन्ही राजकीय पक्ष तसेच महाराष्ट्र व देशातील सर्वच राजकीय पक्षाचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी अपात्र केले नाही.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट व शिवसेना उध्वव ठाकरे या दोन्ही गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असून त्या याचिकावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.मागील आठवड्यात न्यायालयाने या सुनावणी साठी तीन तारखा जाहीर केल्या होत्या पण  यावर मात्र सुनावणी झाली नाही.दरम्यान या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने आजची तारीख निश्चित केली आहे ‌.तरी या प्रकरणाचा नंबर खूपच खाली असल्याने हे प्रकरण आज सुनावणी साठी आज येण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे आज या प्रकरणी सुनावणी होती की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे. त्या मुळे न्यायालय सुनावणी साठी कधीची तारीख देते हे पाहणं आज महत्त्वाचे  ठरणार आहे.तसेच भारताचे सरन्यायाधीश डी .वाय.चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ लाख सेवानिवृत्त होत आहे.दरम्यान ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी या निकालावर सुनावणी संपवणे महत्त्वाचे असणार आहे.

Previous articleभिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक काही काळ परिसरात तणावाचे वातावरण
Next article२५ तासांच्या विसर्जन मिरवणूक नंतर लालबागच्या राजाला अखेरचा निरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here