Home Breaking News अजित पवार यांचे १० नगरसेवक शरद पवार गटात जाणार, काकांनी पुतण्याला दिला...

अजित पवार यांचे १० नगरसेवक शरद पवार गटात जाणार, काकांनी पुतण्याला दिला पुण्यात झटका

69
0

पुणे दिनांक १९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काही दिवसांतच राज्यात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत.याच पार्श्वभूमीवर पुण्यातील अजित पवार यांच्या गटाचे एकूण १० नगरसेवक हे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना पुण्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दिनांक २७ सप्टेंबरला  हे नगरसेवक जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात जाणार आहेत.दरम्यान शरद पवार यांच्या खंदे समर्थक व माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पक्ष प्रवेशा नंतर पुण्यातील वडगावशेरी मध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांची सभा होणार आहे.याच सभेत अजित पवार यांच्या गटातील १० नगरसेवक शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार.एकंदरीत पुण्यात काकाने पुतण्याला मोठा धक्का दिला आहे.आता जेष्ठ नेते शरद पवार यांना सोडून गेलेले अनेक आजी माजी आमदार व नगरसेवक हे पुन्हा शरद पवार यांच्या गटात सहभागी होताना दिसत आहे.

Previous articleराहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आज राज्यभर आंदोलन
Next articleविद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, अजित पवार यांची आमदारांना हमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here