Home Breaking News एन्जॉय ग्रुपच्या एकूण ७ जणांवर लोणीकंद पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई

एन्जॉय ग्रुपच्या एकूण ७ जणांवर लोणीकंद पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई

163
0

पुणे दिनांक १९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) स्वारगेट मध्ये सन २०१३ मध्ये झालेल्या कुणाला शंकर पोळ यांचा खून करणा-या आरोपीचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एन्जॉय ग्रुपच्या एकूण ७ आरोपी विरुद्ध लोणीकंद पोलिस स्टेशन यांच्या वतीने पुणे शहर पोलिसांकडे पाठविण्यात आलेल्या मोक्का प्रस्तावास अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम २३(१) (अ) अन्वये मंजुरी देण्यात आली आहे.दिनांक २९ ऑगस्टला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हाॅटेल स्वराजगार्डन कोलवडीकडे जाणाऱ्या जुन्या रोडवर जुन्या वादातून घातपात करण्यासाठी जात असताना लोणीकंद पोलिसांनी 👮 त्यांना अटक केली होती.

दरम्यान मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या एकूण सात जणांची नावे १) अमित म्हस्कु अवचरे उर्फ औचरे (वय २७ रा.फुरसुंगी हडपसर पुणे) २) सुमित उत्तरेश्र्वर जाधव (वय २६ रा.गंजपेठ पुणे) ३) लतिकेश गौतम पोळ ( वय २२ रा.कात्रज कोंढवा पुणे ४) शुभम उर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७ रा.भेकराई नगर पुणे) ५) ओंकार उर्फ भैय्या अशोक जाधव ( वय २४ रा.भारती विद्यापीठ पुणे) ६) अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७ रा.भेकराईनगर फुरसुंगी पुणे) ७) राज बसय्या उर्फ बसवराज स्वामी ( वय २६ रा.भेकराईनगर फुरसुंगी पुणे) असे आहेत. या सर्वांनी हल्ला करण्याच्या उद्देशाने एकत्रितपणे येऊन तपासात असं निष्पन्न झाले आहे.हे सर्व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व इतर फायद्यासाठी गुन्हेगारी करतात व संघटित रित्या सदरचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.दरम्यान प्रस्तुत गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) ३(२) ३(४) या कलमांचा अंतर्भाव करणे कामी  लोणीकंदचे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरिक्षक रवींद्र गोडसे पोलिस नाईक प्रशांत कापुरे. पोलिस अंमलदार सागर कडू.शुभम सातव.सुधीर शिवले.यांनी प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त परिमंडळ ४ पुणे हिम्मत जाधव यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे मनोज पाटील यांना सादर करण्यात आला होता.त्यांनी यातील आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करुन सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे या करीत आहेत.सदरची कारवाई पोलिस आयुक्त पुणे शहर अमितेशकुमार.पोलिस सह.आयुक्त रंजन कुमार शर्मा.अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील.पोलिस उपायुक्त हिंमत जाधव.वरिष्ठ पोलिस निरीक्षक रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरिक्षक रवींद्र गोडसे.पोलिस नाईक.प्रशांत कापुरे. पोलिस अंमलदार सागर कडू.शुभम सातव.व सुधीर शिवले यांनी केली आहे.

Previous articleअहमदनगर मध्ये भरदिवसा एका युवकावर गोळीबार एकच खळबळ
Next articleपुण्यातील खानापूर येथील गोळीबारातील जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू, गावात तणावाचे वातावरण पोलिस बंदोबस्तात वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here