Home Breaking News राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आज राज्यभर आंदोलन

राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आज राज्यभर आंदोलन

60
0

पुणे दिनांक १९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज गुरुवारी दिनांक १९ सप्टेंबर रोजी काॅग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार व केंद्र सरकार मधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात महायुती सरकार मधील शिंदे गटाचे शिवसेनाचे आमदार संजय गायकवाड यांनी व भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी काॅग्रेस पक्षाच्या वतीने निषेध नोंदवला जाणार आहे. दरम्यान आज काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काॅग्रेस पक्षाचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच पक्षाचे आमदार खासदार तसेच नगरसेवक व पदाधिकारी आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करणार असल्याची माहिती काॅग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

Previous articleसिल्लोडचा उल्लेख वारंवार पाकिस्तान केल्याच्या निषेधार्थ आज सिल्लोड बंदची हाक
Next articleअजित पवार यांचे १० नगरसेवक शरद पवार गटात जाणार, काकांनी पुतण्याला दिला पुण्यात झटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here