पुणे दिनांक १९ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सिल्लोडचे शिवसेना आमदार व मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड बंदची हाक दिली आहे.दरम्यान भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व मंत्री राहिलेले रावसाहेब दानवे यांनी या पूर्वी सिल्लोडचा उल्लेख वारंवार पाकिस्तान केल्याच्या गंभीर आरोप सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.त्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी सत्तार यांनी सिल्लोड बंदची हाक दिली आहे.तसेच बंदचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील त्यांनी आज माध्यामांशी बोलतांना दिली आहे.तसेच सत्तार हे आज रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मोर्चा देखील काढणार आहेत . दरम्यान महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असून सत्तात या मंत्रीमंडळात मंत्री देखील आहे.पण मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रावसाहेब दानवे व सत्तार यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.यांच्या दोघां मधील वाद आता चांगलाच उफाळून आला आहे.त्या मुळे आता विरोधीपक्षांना आता त्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे.या दोघांमधील वादाचा फटका महायुती सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीत बसण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.