Home Breaking News जम्मू -काश्मीर मध्ये सीमा सुरक्षा दलाची बस दरीत कोसळली,३ जवान ठार तर...

जम्मू -काश्मीर मध्ये सीमा सुरक्षा दलाची बस दरीत कोसळली,३ जवान ठार तर २६ जण गंभीर रित्या जखमी

94
0

पुणे दिनांक २० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार एक खळबळजनक घटना घडली असून.जम्मू-कश्मीर मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) बसला अपघात झाला आहे.बस खोल दरीत कोसळली आहे.यात ३ जवान ठार झाले आहेत.तर अन्य २६ जवान गंभीर रित्या जखमी झाले आहेत.बस मध्ये एकूण ३५ जवान होते.दरम्यान यात काही जवान हे गंभीर रित्या जखमी झाले असून या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान या अपघाताबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.आज बीएसएफच्या जवानांची टीम जम्मू -काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्ता करीता जात असताना बसला अपघात झाला आहे.दरम्यान अपघातानंतर बचावकार्याचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.यातील जखमी जवानांना उपचारासाठी खानसाहेब व बडगाम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदरची बस मधील सर्व जवान हे दक्षिण जम्मू -काश्मीर मधील उद्या होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीच्या बंदोबस्ता करीता जात असताना या बसला अपघात झाला आहे.अशी माहिती मिळत आहे.

Previous articleमराठा आरक्षण संदर्भात उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन
Next articleआज बीड जिल्हा बंदची मराठा समाजाच्या वतीने हाक, अंतरवाली सराटीत लाखो मराठा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here