Home Breaking News जालना -वडीगोद्री महामार्गावर एसटी बस व आयशर ट्रकची टक्कर ५ ठार तर...

जालना -वडीगोद्री महामार्गावर एसटी बस व आयशर ट्रकची टक्कर ५ ठार तर १४ गंभीर रित्या जखमी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

167
0

पुणे दिनांक २० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना ते वडीगोद्री रोडवरील शहापूर येथे एसटी बस व आयशर ट्रक यांच्यात टक्कर होऊन भीषण असा अपघात झाला आहे.या अपघातात ५ जण ठार झाले आहेत.तर १४ जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार एसटी बस गेवराई कडून अंबडकडे जात होती. आयशर ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात  समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

दरम्यान जालना वडीगोद्री रोडवरुन शहापूर गावा जवळ गेवराई कडून अंबडकडे जाणाऱ्या एसटी बसने  मोसंबी भरुन जाणाऱ्या आयशर ट्रकला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.यात ५ जण ठार झाले आहेत.तर अन्य १४ प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत.त्यांच्यावर अंबड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यात मृतांच्या आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन्ही वाहनं समोरा समोर धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान आयशर ट्रक हा समोरुन येणा-या एसटी बसला जोरात धडक दिली आहे.या एसटी बस मध्ये एकूण २४ प्रवासी हे प्रवास करत होते.

Previous articleपंढरपुरात आज धनगर समाजाची महत्वपूर्ण बैठक
Next articleमराठा आरक्षण संदर्भात उद्या बीड जिल्हा बंदचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here