Home Breaking News पुण्यातील खानापूर येथील गोळीबारातील जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू, गावात तणावाचे वातावरण...

पुण्यातील खानापूर येथील गोळीबारातील जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू, गावात तणावाचे वातावरण पोलिस बंदोबस्तात वाढ

228
0

पुणे दिनांक २० सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील खडकवासला येथील खानापूर गावात दिनांक १४ सप्टेंबर रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास दोन गटात हाणामारी होऊन गोळीबाराची घटना घडली होती.यात गोळ्या लागून जखमी झालेल्या एका युवकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.त्याचे नाव सोमनाथ अनंता वाघ (वय२४ रा. खानापूर ता.हवेली.जि.पुणे) यांचा काल रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला आहे.दरम्यान सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर खानापूर गावामध्ये शोककळा पसरली असून सध्या गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी गावात पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक १४ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास खडक वासला खानापूर येथील सांबरे वाडी गावात दोन गटात पूर्ववैमनस्यातून घेरा गावच्या हद्दीत रोहित उर्फ भो-या ढिले व तेजस वाघ यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली होती.या हल्ल्यात रोहित उर्फ भो-या ढिले याला लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती.तर यात सोमनाथ यांच्यावर  चेतन उर्फ दादा जावळकर यांने रिव्हालवर मधून दोन गोळ्या झाडल्या होत्या.ह्या गोळ्या सोमनाथच्या छातीत लागल्या होत्या.त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा काल रात्री रुग्णालयात मृत्यू झाला आहे.पोलिस स्टेशन मध्ये दोन्ही गटाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.हवेली पोलिसांनी 👮 चेतन उर्फ दादा जावळकर.यश उर्फ मामा जावळकर. व प्रविण सांबरे अटक केली आहे.या प्रकरणी पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन वांगडे हे करीत आहेत.

Previous articleएन्जॉय ग्रुपच्या एकूण ७ जणांवर लोणीकंद पोलिसांकडून मोक्का अंतर्गत कारवाई
Next articleमराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, उपचारासाठी नकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here