पुणे दिनांक २१ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील वडगावशेरी भागातील मतेनगगर येथील एका सुपर मार्केटला भीषण आग लागली आहे. दरम्यान या आगीची माहिती मिळाल्यानंतर पुणे महानगरपालिका व पीएमआरडीए अग्निशमन दला च्या एकूण आठ अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान हे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.दरम्यान ही लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे.अशी माहिती मिळत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकरची जीवीत हानी झालेली नाही.असे अग्निशमन दलाच्या जवानांच्या वतीने सांगण्यात आले आहे.दरम्यान या आगीत मालमत्तेचे किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.