पुणे दिनांक २१ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुका तातडीने उद्याच २२ सप्टेंबर रोजीच घ्या.असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.तसेच अचानकपणे निवडणूक स्थगितीचा राज्य सरकारचा निर्णय हायकोर्टाच्या वतीने रद्द करण्यात आला आहे.दरम्यान मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकी च्या स्थगितीच्या विरोधात युवा सेनेने आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी झाली आहे.