पुणे दिनांक २१ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्य सरकारच्या वतीने पून्हा एकदा मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश काल देण्यात आले आहे.त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार गटाच्या वतीने एक्सवर पोस्ट करत महायुतीच्या सरकारवर चांगलाच निशाण साधला आहे.” पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला.एकदा नव्हे तर दोनदा सिनेटची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान महायुतीचे सरकार आता निवडणूकांना एवढे घाबरलेले सत्ताधारी महाराष्ट्राने कधीच पाहिले नसतील. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचे राहत नाही, सूर्योदय होणार,असे पोस्ट मध्ये म्हटले आहे. आणि महायुती सरकारवर पोस्ट द्वारे चांगलाच निशाण एकंदरीत साधला आहे.