पुणे दिनांक २१ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सातारा ते पुणे महामार्गावर असलेल्या खंबाटकी घाटात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे.तामिळनाडूवरुन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकचे ब्रेक अचानकपणे फेल झाल्यांने ट्रकने एकापाठोपाठ एक अशा एकूण चार कार यांना जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार मधील प्रवासी हे जखमी झाले आहेत.सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.दरम्यान या अपघातात चार कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरम्यान या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मध्यरात्री एक वाजता खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर एस काॅर्नरजवळ मागून येणारा ट्रक टी.एन.४६ ए.स.१४९९ या ट्रकचे ब्रेक अचानकपणे फेल झाल्यांने ट्रकने पुढं असणाऱ्या एकूण चार कारला एकापाठोपाठ एक करत धडक दिल्याने ह्या कार रोडच्या बाजूला जाऊन पडल्या आहेत.त्या नंतर ट्रक चौथ्या कारला धडकून अडकून राहिला.दरम्यान भीषण असा अपघात होऊन देखील चार कार मधील प्रवासी हे सुदैवाने त्यांचा जीव वाचला आहे.मात्र या अपघातात यातील चार कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.दरम्यान अपघाता नंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.