पुणे दिनांक २१ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आता वडीगोद्रीत मध्ये पुन्हा तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.दरम्यान सोलापूर ते धुळे महामार्गावर मराठा समाजाच्या आंदोलंकाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे .यावेळी मराठा समाज व ओबीसी समाज पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.त्यामुळे आता येथे मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला आहे.या ठिकाणी पोलिसांनी 👮 आता मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवला आहे.
दरम्यान आता याठिकाणी मराठा समाज व ओबीसी समाज आंदोलक मोठ्या प्रमाणावर एकामेकांच्या आमनेसामने येऊन मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत आहेत.याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असतानाही मराठा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे आंदोलक आमनेसामने येत आहे.दरम्यान अंतरवाली सराटीच्या रस्त्यावरच लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले आहेत.तर या रोडवरुनच मराठा समाजाचे आंदोलक अंतरवाली सराटीत लाखोंच्या संख्येने येत आहेत.त्यामुळे गोंधळ होत आहे.त्यातच आता मराठा आंदोलकांनी संतप्त होत सोलापूर ते धुळे महामार्गावर रास्तारोको सुरू केला आहे.दरम्यान काल जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मोठा राडा झाला होता.उपोषनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी निघालेल्या मराठा समाजाच्या बांधवांची वाहने पोलिसांनी 👮 बॅरीकेंटीग लावून अडवली होती.त्या ठिकाणी मराठा समाजाचे आंदोलक व ओबीसी समाजाचे आंदोलक यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली होती.त्यानंतर आज पुन्हा एकदा मराठा समाजाचे आंदोलक व ओबीसी समाजा चे आंदोलक एकामेकांच्या समोर आले आहेत.