Home Breaking News साताऱ्यात भरघाव ट्रकने १० वाहनांना दिली टक्कर वाहनं झाली चक्काचूर तर १२...

साताऱ्यात भरघाव ट्रकने १० वाहनांना दिली टक्कर वाहनं झाली चक्काचूर तर १२ प्रवासी जखमी पोलिसांनी ट्रक चालकाच्या आवळल्या मुसक्या

139
0

पुणे दिनांक २२ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सातारा येथील खंडाळ्यात ट्रक चालकाने तब्बल १० गाड्यांना उडवलं आहे.अशी धक्कादायक व खळबळ जनक अपडेट मिळाली आहे.दरम्यान सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार साता-यातील खंडाळ्यात महामार्गावर जुन्या टोल नाका भागात सर्व्हिस रोडवर भरघाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने जवळपास एकूण १० वाहनांना ठोकले आहे.दरम्यान या भीषण अपघातात एकूण १० ते १२ प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले आहेत.

दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना खंडाळा भुईंज महामार्ग पोलिस व शिरवळ रेस्क्यू टीम ने सहकार्याने तातडीने खंडळा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या अपघाता प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान सदरच्या अपघातानंतर या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. भरघाव ट्रकने दिलेल्या ठोकरमुळे अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला आहे.तर या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.तर अनेक नवीन गाड्यांचा देखील चक्काचूर झाला आहे.पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक चालकाला अटक केली असून आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Previous articleमराठा आरक्षण मिळत नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, महायुतीचे सरकार अजून किती मराठा युवकांचे बळी घेणार?
Next articleपुण्यातील काही भागात विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here