पुणे दिनांक २२ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील काही भागात पावणेदहाच्या सुमारास अचानकपणे मुसाळधार पावसाला सुरुवात झाली आहे.दरम्यान पुण्यातील न-हे .धायरी नांदेड. किरकिटवाडी तसेच खडकवासला परीसरात विजेच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान पाऊस सुरू झाल्यानंतर या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.दरम्यान हवामान विभागाच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.याच बरोबर घोरपडी भागात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे.
दरम्यान आज रविवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे मुसाळधार पावसाला सुरुवात झाली आहे.वीजेच्या कडाकडासह या भागात मुसळधार पाऊस झाला आहे.त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.याभागात एक तास मुसळधार पाऊस कोसळत होता.दरम्यान पुणे शहरात ५ ते ६ दिवस मुसळधार पाऊस सुरू रहाण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.तसेच २३ व २४ सप्टेंबरला अहमदनगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.तसेच विदर्भात देखील मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.