पुणे दिनांक २२ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील शेतकरी अमोल निलंगे या शेतकऱ्याने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली आहे.आत्महत्या पूर्वी अमोल यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.यात कर्जमाफी केल्याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करणा-या महायुती सरकारची पोलखोलच केली आहे.अमोल यांनी शेतीच्या कामा करीता ट्रॅक्टर घेतला होता.तसेच शेतीवर देखील कर्ज घेतले होते.व सतत होणाऱ्या नापिकीमुळे त्यांना ट्रॅक्टर चार हाप्ता व शेतीवरील कर्ज ते फेडू शकले नाही. तसेच त्यांच्या मुलाचा सैनिक स्कुल यादीत नंबर सर्वात शेवटी आल्याने त्यांला सैनिक स्कूल मध्ये दाखल होता न आल्याने ते निराशाजनक अवस्थेत होते.तसेच जर मराठा समाजाला आरक्षण असते तर तो मेरिट मध्ये आला असता.पण आरक्षण नसल्याने हे सर्व मराठा समाजाच्या युवकांच्या नशिबी येत आहे.त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या करतोय,असे अमोलने सुसाइड चिठ्ठीत लिहून आत्महत्या केली आहे.त्यामुळे आता हे महायुतीचे सरकार अजून किती मराठा समाजाच्या युवकांचा बळी घेणार आहे.? असा आता गंभीर असा प्रश्न सर्व मराठा युवकांना पडला आहे.