पुणे दिनांक २३ सप्टेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सकल मराठा समाजाच्या वतीने आज सोमवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.दरम्यान मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत मागील सात दिवसांपासून उपोषण करीता बसले आहेत.उपोषनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आजचा बंद पाळला जात आहे.आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ७ वा दिवस असून त्यांची तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.दरम्यान मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे.तसेच महायुतीच्या सरकारने हैदराबाद.सातारा.व बाॅम्बे गॅझेट तातडीने लागू करण्यात यावे.तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्याव्यात.तसेच सगेसोयरेची अंमल बजावणी तातडीने लागू करण्यात यावी.अशी मागणी राज्य सरकारकडे मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.दरम्यान आज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा ७ वा दिवस असून देखील महायुतीचे सरकार हे त्यांच्या उपोषणाणी अद्याप दखल घेतली नाही.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रीमंडळाची कॅबिनेटची बैठक असून आजच्या कॅबिनेट मध्ये काय निर्णय घेतला जातो.हे आजच दुपारपर्यंत कळेल.दरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटीत लाखोंच्या संख्येने दाखल होत आहेत.